मी
मतदानाच्या दिवशी घरी राहतो...
आणि निवडून आलेल्या उमेदवाराच्या नावाने खडे फोडतो
माझ काम असेल तर शे दोनशे देऊन पूर्ण करतो...
आणि नंतर भ्रष्टाचार खूप वाढलाय म्हणून ओरडतो
मुलगी दिसली की आचकत विचकत बोलतो...
आणि नंतर स्त्रीयांवर एवढे अन्याय का होतात हा विचार करतो
कष्ट करायला आळस करतो...
आणि यश नाही मिळाल म्हणून नशिबाच्या नावाने रडतो
हक्काच्या नावाने नेहमी ओरडतो...
आणि कर्तव्य मात्र विसरतो
एखाद्याचे आडनाव कळताच जातीचा वेध घेतो....
आणि नंतर बोलतो जाती मधील भेदभाव कधी थांबतो
पण आता मला कळलं....
शर्यतीत भाग न घेता मी शर्यत जिंकू शकत नाही
आणि स्वतः सुधारल्याशिवाय चांगल्या नगराची व सागराची अपेक्षा ठेवु शकत नाही...
मी बरोबर असल्याशिवाय दुसऱ्याला चूक ठरवू शकत नाही!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा