कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२८ मार्च २०२१

संघर्ष

संघर्ष हा तुझा लहान नसतो
की माझा मोठा नसतो
संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...

संघर्ष म्हणजे लढा असतो
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संकटांचा वेढा असतो
तरीही अशा परिस्थितीत आनंदाने गायलेला पाढा असतो
कारण मित्रा शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...

संघर्ष हा सिनेमाएवढा नाट्यमय नसतो
तर समाजाने केला तेवढा थट्टामय पण नसतो
संघर्ष म्हणजे कधी नशीबाची शिडी तर कधी साप असतो
आणि या संघर्षाची काळोखी रात्र संपविणारा सूर्य
फक्त आणि फक्त तुझा मायबाप असतो
म्हणून मित्रा शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...

संघर्ष म्हणजे आयुष्यातील 
कधी वळण तर कधी घाट असतो
अपयशानंतर मिळालेला पाठ असतो
तर यशानंतर डोक्यावर घेऊन मिरवलेला थाट असतो
पण शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...

संघर्ष हा त्या कर्णाचा
तू रोज जगत असलेल्या मरणाचा
की मरणासाठी रोज शोधत असलेल्या कारणांचा..
शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो...

संघर्ष म्हणजे तुझ्या स्वप्नासाठी 
कुटुंबाने लढलेला एक डाव असतो
तू लढला तर त्यांना मिळालेला योग्य तो भाव असतो
तुझ्याबरोबर जिंकलेला तुझा तो गाव असतो
म्हणून मित्रा शेवटी संघर्ष हा संघर्ष असतो
तुझा तू आणि माझा मी करायचा असतो....

१२ मार्च २०२१

मास्तर

मास्तर घेतील हो पुन्हा छडी
पण शिकायला नसणार आता आपली पिढी
कारण इथं प्रत्येकाला हवी यशाची शॉर्टकट शिडी
मग काय करणार मास्तर घेऊन छडी...

मास्तरच्या छडीचा खरच होता धाक
म्हणून तर व्हायची गर्दी
पकडायला तो पाठीमागचा बाक

मास्तरच्या छडीमुळेच 
करायचो आम्ही गृहपाठ
म्हणुन तर आज झाली
आमची मान ताठ...

आता मास्तरच्या हातची छडी गेली
शाळेत जाण्याची ती ओढ गेली
शाळेतील शिकवणारी ती बाई गेली
कारण, तर म्हणे आता नवीन मॅडम आली

 मास्तर तुमच्या हातातील छडी गेली
 अन तुमच्यातला मास्तर हरवत गेला
 का तर म्हणे तुमची जागा युट्यूब ने घेतली
 आणि सर्व पिढी शाळेची घंटा सोडून
 मोबाईलला नेटवर्क येण्याची वाट बघू लागली

उत्क्रांतीचा नियम मास्तर 
तुम्हीच आम्हाला शिकवला
अस वाटलं नव्हतं की एक दिवस
कोणी म्हणेल की क्रांतीमुळे मास्तरच हरवला...

२१ फेब्रुवारी २०२१

मीच जबाबदार

मीच जबाबदार
बंद झाले होते जगाचे सर्व दार 
समजत नव्हता कोणता वार
तरीही कळत नसेल का, काय आहे हा कोरोना एक प्रकार?
आता तरी,
म्हणा मीच जबाबदार...

नियम पाळायचे मला नाही कळणार
मी देणार मास्कला नकार
मग काय सर्वच करणार सरकार?
आता तरी,
म्हणा आता मीच जबाबदार...

नुसतं घुसतो गर्दीत न करता कोणता विचार
खाल्ल्या कितीतरी मार
तरीही नाही सुधरलो मी यार...
मग काय फायदा त्यांचा जे लढत आहेत जिवापार
पण आता...
सर्व ठीक होण्याचे स्वप्न करणार मी साकार
कारण आता आहे मीच जबाबदार...

२९ जानेवारी २०२१

आयुष्यरुपी गाडी


 आयुष्यरुपी गाडीमध्ये...

असावा एक पारदर्शक काच

ज्यातून दिसावा आयुष्याच्या वाटेवर आलेल्या व्यक्तीचा खराखुरा नाच...


असावा जबाबदारीचा सीटबेल्ट

ज्याने कुटुंबासोबत अस बांधाव की जणू एक नट-बोल्ट...


असावा एक आशीर्वादाचा मजबूत हेल्मेट

ज्याने सुरक्षितपणे पूर्ण करावी होणारी भेट...


असावी एक विश्वासरुपी प्रथमोपचार पेटी

जिच्यामुळे पूर्ण व्हाव्या अजुनही काही भेटी...


असावा एक गुरुरूपी हॉर्न

ज्याने प्रत्येक वळणावर करावं वॉर्न...


असावी एक मैत्रीरुपी स्टेपनी

जिच्या प्रत्येक प्रसंगात याव्या आठवणी...


असावा एक वडीलरूपी स्टेअरिंग

ज्यांनी संकटांना तोंड देण्याचं द्यावं डेअरिंग...


असावा मुलांरुपी आरसा

ज्यांनी दाखवावा भुतकाळात तुम्ही जपलेला वारसा...


आयुष्याची ही गाडी चालव सावकाश....

जरा होऊन जाऊ दे..

सागराहून अथांग तुझ्या यशाचा प्रकाश

करून वाटेवरील प्रत्येक संकटाचा विनाश.....

१५ जानेवारी २०२१

मी




 मी


मतदानाच्या दिवशी घरी राहतो...

आणि निवडून आलेल्या उमेदवाराच्या नावाने खडे फोडतो


माझ काम असेल तर शे दोनशे देऊन पूर्ण करतो...

आणि नंतर भ्रष्टाचार खूप वाढलाय म्हणून ओरडतो


मुलगी दिसली की आचकत विचकत बोलतो...

आणि नंतर स्त्रीयांवर एवढे अन्याय का होतात हा विचार करतो


कष्ट करायला आळस करतो...

आणि यश नाही मिळाल म्हणून नशिबाच्या नावाने रडतो

 

हक्काच्या नावाने नेहमी ओरडतो...

आणि कर्तव्य मात्र विसरतो


एखाद्याचे आडनाव कळताच जातीचा वेध घेतो....

आणि नंतर बोलतो जाती मधील भेदभाव कधी थांबतो


पण आता मला कळलं....

शर्यतीत भाग न घेता मी शर्यत जिंकू शकत नाही

आणि स्वतः सुधारल्याशिवाय चांगल्या नगराची व सागराची अपेक्षा ठेवु शकत नाही...

 मी बरोबर असल्याशिवाय दुसऱ्याला चूक ठरवू शकत नाही!

१० जून २०२०

हॉस्टेल


प्रवेश मिळायला इथं लागायचा मोठा कस,
होस्टेल सोडल तरीही विसरलो नाही ती संध्याकाळची सहाची बस;

बस आणि हॉस्टेलमध्ये असायची नेहमी चेष्टा,
कसा विसरणार तो दूध,अंडे, उप्पीट आणि पोह्यांचा नाष्टा;

प्रत्येकाची असे इथं वेगळी मर्जी,
कसा विसरणार ती रूममध्ये केलेली भुर्जी;

बुधवार आणि शुक्रवारच जेवण म्हणेज जणू मेजवानी,
कसा विसरणार ते जगलो जीवन इथं आम्ही राजावाणी;

जेवायला बाहेर जाण्यासाठी हक्काची फक्त राहुलची गाडी,
कसा विसरणार टेरिसवर मारलेली प्रत्येकाची उडी;

आठवतो तो प्रत्येकाचा केलेला वाढदिवस,
कसा विसरणार तो मित्रांच्या आपुलकीचा प्रत्येक दिवस;

इथे प्रत्येकाचे जपायचो आम्ही मन,
कसा विसरणार महिन्याला मिळालेलं पाचशे रुपयाच धन;

रुपयांचे नसेल तरीही प्रेमाचे झाले प्रत्येकावर कर्ज,
कसा विरसरणार ते गेटवर दिलेले अजिबो-गरीब कारणांचे अर्ज;

पावसाळ्यात वेगळीच मज्जा भिजण्यासाठी लपवायची छत्री,
कसा विसरणार भावेश आणि मी दूध तापवण्यासाठी वापरलेली इस्त्री;

आमच्या कर्मामुळे कधी सर तर कधी मामा व्हायचे नाराज, कस विसरणार ते कर्म म्हणजे टेरिसवर केलेला आवाज;

IPL आणि परीक्षा म्हणजे नुसतं दंगा आणि जागर,
कसा विसरणार ते हॉस्टेल जणू आठवणीचा अथांग 'सागर';

कसा विसरणार तो शेवटचा दिवस,
जवळचे सर्व दूर जाणार होते, होस्टेलच्या आठवणीत रडणार होते,
आता मात्र सर्व एकमेकांना विसरणार होते,
आता आयुष्यात कधी भेटणार काही माहीत नाही,
पण ते हॉस्टेलचे दिवस कधी विसरणार नाही.

मैत्री


मैत्री म्हणजे स्वभाव;
प्रेमाचं एक गाव,

मैत्री म्हणजे घासातील घास;
एकमेकावरचा अतूट विश्वास,

मैत्री म्हणजे चेष्टा;
थँक्सच्या ऐवजी तू दिलेला नाश्ता,

मैत्री म्हणजे हृदयाचा ठोका;
जेवणानंतर बिल भरताना दिलेला धोका,

मैत्री म्हणजे प्रेमळ भावना;
जगण्यासाठी मिळालेली प्रेरणा,

मैत्री म्हणजे कर्ण;
तू माझ्यासाठी अन मी तुझ्यासाठी मरण,

मैत्री म्हणजे अनोखं नात;
जेव्हा मैत्रीनंतर प्रेम होत,

मैत्री म्हणजे साथ;
संकटात पाठीवरचा हाथ,

मैत्री म्हणजे मी निराधार;
तेव्हा तू दिलेला आधार,

मैत्री म्हणजे आठवण;
निस्वार्थ भावनेच ते बालपण,

मैत्री म्हणजे प्रेम;
भावनांनी रंगलेला गेम,

मैत्री म्हणजे पावसाची सर;
तुझ्यासाठी झालेला मी नदीचा सागर.

कराड

तू हॉस्टेलची ती एक रूम;
मी त्याच रूमचा नसलेला तो बेडरूम प्रिये,

तू पाण्याने भरलेली ती टाकी;
मी तुझ्यासाठी झालेलो एक खाकी प्रिये,

तू मेसमध्ये मिळणारी नॉन-व्हेजची ती थाळी;
मी टेरिस वरून ठोकलेली जोराची आरोळी प्रिये,

तू बरकडे सरांची ती ऑर्डर;
मी गेट वरच्या मामांना दिलेलं ते एक लेटर प्रिये,

तू वडोलीची ती एक लाल परी;
मी त्याच रस्त्यावरची ती तुटकी-फुटकी पान टपरी प्रिये,

तू हॉस्टेल मध्ये रंगलेली क्रिकेटची मॅच;
मी तुला बघताना सोडलेली ती एक कॅच प्रिये,

तू बसमधील तो सुंदर चेहरा;
मी माझ्याच स्वप्नातील तुझा तो नवरा प्रिये,

तू कॉलेजच्या कॅन्टीनची मिसळपाव;
मी फेमसचा वडापाव प्रिये,

तू गळ्यातील सोनेरी चैन ;
मी तुझा एक फॅन प्रिये,

तू बसची ती मासिक पास;
मी बस मध्ये चढण्यासाठी केलेला तो एक ध्यास प्रिये,

तू कधीही न मिटणारी माझी आठवण;
मी आयुष्यात कधीतरी आलेला आनंदाचा तो एक क्षण प्रिये,

तू एक न उलगडणार कोड;
मी माणिकनगरच ते बस स्टँड प्रिये,

तू कराडची शान;
मी त्याच कराडमध्ये उंचावलेली ती मान प्रिये,

तू नवरात्रीचा तो जागर;
मी याच कवितेचा कवी सागर प्रिये

सुखी होण्याचं गुपित

          "द अल्केमिस्ट" या पुस्तकाबाबत स्पर्धा परीक्षेच्या एका डेमो लेक्चर मध्ये ऐकायला मिळाले. म्हटलं वाचूया हे पुस्तक पण आपल्या...