ओळखलंत का सर मला, सावकाश आला कोणी,
कपडे होते फाटके, कानामध्ये हेडफोन घालुनी,
क्षणभर हसला, नंतर बसला, बोलला मोबाईलमधी पाहुनी,
Series आली, download केली टेलिग्राम वरूनी,
Family Man सारखी, गेली हिट होऊनी,
अशी कशी जाईन,गेली एक suspens देऊनी,
Range गेली, Battery गेली, होत नव्हते गेले
आठवण म्हणुन पुढील season चे नोटिफिकेशन तेवढ ठेवले,
मित्रांना घेऊन सोबत, पैसे आता जमवत आहे,
वेळात वेळ काढून एक एक एपिसोड संपवत आहे,
मोबाईल कडे हात जाताच, हसत हसत उठला,
PhonePe नको सर, जरा डेटा कमी पडला
मित्र गेले कामाला, म्हणून एकटेपणा तेवढा वाटला
मोडून पडला संसार (Data pack), तरी मोडला नाही कणा,
Hotspot चालू ठेवून, फक्त बघ म्हणा