प्रत्येक व्यक्तीच्या काही सीमा असतात, त्याचे उल्लंघन हा मानवाचा स्वभावच नाही. पण खूप जण असे असतात की ते आपापल्या zone (comfort zone) मध्ये आनंदी असतात मग काय गरज आपल्या त्या झोन च्या बाहेर जाण्याची.
पण काही लोक असतात ते नेहमी आपल्या ज्ञानाच्या, व्यवहाराच्या कक्षा रुंदवण्याचा नेहमी प्रयत्न करतात.
या एकविसाव्या शतकात आपण आपल्या क्षेत्रात बळकट आणि update असेल तरच आपण टिकून राहू शकतो.
काळ असा आहे की आपण जर मेकॅनिकल इंजिनिअर पार्श्वभूमी असलेले असाल तर गरजेचे नाही की फक्त आपल्याला तेव्हढंच जमायला हवं. आपल्याला संगणक, माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान, व्यावहारिक गणित, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र अशा बऱ्याच क्षेत्रातील माहिती असणे गरजेचे आहे तरच आपण आजच्या महिती तंत्रज्ञाच्या युगात टिकू शकतो. तसच हे इतर क्षेत्रातील लोकांना पण लागू होते.
इतिहासात आपल्याला आढळते की आजच्याच मुहूर्तावर राजे महाराजे त्यांचे साम्राज्य विस्तारण्यासाठी मोहिमा सुरू करायचे, व्यावसायिक आपला व्यवसाय वाढविण्यासाठी विदेशी मोहीमा राबवायचे.
मग आपण कुठवर आपल्या सीमेमध्येच अडकून राहणार. आपल्याला पण आपल्या ज्ञानाच्या मोहिमा राबवाव्या लागतील आणि विस्तार करावा लागेल आपल्या बौद्धिक साम्राज्याचा.
वेळ आहे मित्र-मैत्रिणींनो आपल्या सीमा रुंदवण्याचा म्हणजेच सीमोल्लंघनाची.... तर चला...सीमा ओलांडूया !
मित्रहो...आज विजयादशमी. तुम्ही ज्या कुठल्याही क्षेत्रात असाल...तिथल्या सीमा ओलांडा. प्रगतीची नवनवीन शिखरे गाठा आणि मैत्रीचे...प्रेमाचे सोने वाटा. नव्या गोष्टी करण्यासाठी तुमचा प्रत्येक दिवस मुहूर्ताचा असावा..