१० जून २०२०

हॉस्टेल


प्रवेश मिळायला इथं लागायचा मोठा कस,
होस्टेल सोडल तरीही विसरलो नाही ती संध्याकाळची सहाची बस;

बस आणि हॉस्टेलमध्ये असायची नेहमी चेष्टा,
कसा विसरणार तो दूध,अंडे, उप्पीट आणि पोह्यांचा नाष्टा;

प्रत्येकाची असे इथं वेगळी मर्जी,
कसा विसरणार ती रूममध्ये केलेली भुर्जी;

बुधवार आणि शुक्रवारच जेवण म्हणेज जणू मेजवानी,
कसा विसरणार ते जगलो जीवन इथं आम्ही राजावाणी;

जेवायला बाहेर जाण्यासाठी हक्काची फक्त राहुलची गाडी,
कसा विसरणार टेरिसवर मारलेली प्रत्येकाची उडी;

आठवतो तो प्रत्येकाचा केलेला वाढदिवस,
कसा विसरणार तो मित्रांच्या आपुलकीचा प्रत्येक दिवस;

इथे प्रत्येकाचे जपायचो आम्ही मन,
कसा विसरणार महिन्याला मिळालेलं पाचशे रुपयाच धन;

रुपयांचे नसेल तरीही प्रेमाचे झाले प्रत्येकावर कर्ज,
कसा विरसरणार ते गेटवर दिलेले अजिबो-गरीब कारणांचे अर्ज;

पावसाळ्यात वेगळीच मज्जा भिजण्यासाठी लपवायची छत्री,
कसा विसरणार भावेश आणि मी दूध तापवण्यासाठी वापरलेली इस्त्री;

आमच्या कर्मामुळे कधी सर तर कधी मामा व्हायचे नाराज, कस विसरणार ते कर्म म्हणजे टेरिसवर केलेला आवाज;

IPL आणि परीक्षा म्हणजे नुसतं दंगा आणि जागर,
कसा विसरणार ते हॉस्टेल जणू आठवणीचा अथांग 'सागर';

कसा विसरणार तो शेवटचा दिवस,
जवळचे सर्व दूर जाणार होते, होस्टेलच्या आठवणीत रडणार होते,
आता मात्र सर्व एकमेकांना विसरणार होते,
आता आयुष्यात कधी भेटणार काही माहीत नाही,
पण ते हॉस्टेलचे दिवस कधी विसरणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सुखी होण्याचं गुपित

          "द अल्केमिस्ट" या पुस्तकाबाबत स्पर्धा परीक्षेच्या एका डेमो लेक्चर मध्ये ऐकायला मिळाले. म्हटलं वाचूया हे पुस्तक पण आपल्या...