मास्तर घेतील हो पुन्हा छडी
पण शिकायला नसणार आता आपली पिढी
कारण इथं प्रत्येकाला हवी यशाची शॉर्टकट शिडी
मग काय करणार मास्तर घेऊन छडी...
मास्तरच्या छडीचा खरच होता धाक
म्हणून तर व्हायची गर्दी
पकडायला तो पाठीमागचा बाक
मास्तरच्या छडीमुळेच
करायचो आम्ही गृहपाठ
म्हणुन तर आज झाली
आमची मान ताठ...
आता मास्तरच्या हातची छडी गेली
शाळेत जाण्याची ती ओढ गेली
शाळेतील शिकवणारी ती बाई गेली
कारण, तर म्हणे आता नवीन मॅडम आली
मास्तर तुमच्या हातातील छडी गेली
अन तुमच्यातला मास्तर हरवत गेला
का तर म्हणे तुमची जागा युट्यूब ने घेतली
आणि सर्व पिढी शाळेची घंटा सोडून
मोबाईलला नेटवर्क येण्याची वाट बघू लागली
उत्क्रांतीचा नियम मास्तर
तुम्हीच आम्हाला शिकवला
अस वाटलं नव्हतं की एक दिवस
कोणी म्हणेल की क्रांतीमुळे मास्तरच हरवला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा