चिंटू पिंटूचा Permit या विषयावरील संवाद…
चिंटू:- परवाना म्हणजे काय?
पिंटू;- परवाना म्हणजे एखादी गोष्ट करण्याची परवानगी जसे की वाहन चालवण्यासाठी परवाना म्हणजे वाहन अनुज्ञप्ती (Driving License) आणि वाहन वापरून कोणता व्यवसाय करायचा असेल म्हणजे प्रवासी वाहतूक किंवा मालवाहतूक तर त्यासाठी लागतो तो वाहन परवाना म्हणजेच परमिट.
चिंटू:- पण मग संविधानाच्या कलम 19 (1) (g) नुसार तर व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे तर मग Permit ची आवश्यकता का?
पिंटू;- एकदम बरोबर त्याच संविधानाच्या कलम 19 (6) नुसार, जे काही स्वातंत्र्य 19 (1) (g) नुसार दिलेले आहेत त्या स्वातंत्र्यावर काही निर्बंध जनतेच्या हितासाठी असू शकतात. म्हणजेच उद्या कोणीही उठून एखादा डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाही त्यासाठी विशिष्ट शिक्षणाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे मोटार वाहनाचा उपयोग करून व्यवसाय करायचा असेल तर किंवा एखादे Transport म्हणून वापरायचे असलं तर मोटर वाहन कायद्याच्या कलम 66 नुसार परवाना आवश्यक आहे.
चिंटू:-मग कोणतेही वाहन व्यवसाय करण्यासाठी वापरू शकतो का?
पिंटू;- नाही त्या वाहनाची नोंदणी Transport Category मध्येच झालेली असावी.
चिंटू:- मग अस आहे का की सर्व Transport वाहनांना परवान्याची आवश्यकता आहे?
पिंटू;- तसं पण नाही मोटर वाहन कायद्याच्या कलम 66 (3) नुसार काही वाहनांना त्यापासून सूट दिलेली आहे जसे की ॲम्बुलन्स, पोलिसांची वाहने, इत्यादी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य लोक जी वाहने मालवाहतुकीसाठी वापरतात ती त्यांचा GVW जर 3000 Kg खाली असेल ती वाहने जसे की Tata Ace.
चिंटू:- अच्छा मग परमिट एकाच प्रकारचे असते की त्यामध्ये पण वेगळे प्रकार असतात?
पिंटू;- खूप प्रकार आहेत जसे की राज्य प्रवासी वाहतूक करण्यासाठी Stage Carriage Permit, Contract Carriage Permit, मालवाहतूक करण्यासाठी Goods Carriage Permit. तसेच देशाच्या स्तरावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी-Tourist permit, All India Tourist Permit आणि मालवाहतूक करण्यासाठी-National Permit तसेच कमी कालावधीसाठी Temporary Permit आणि Special Permit असे खूप प्रकार आहेत
चिंटू:- परमिट काढायचं कसं मग?
पिंटू;- आता समजा तुमच्या कडे Transport मध्ये नोंदणी केलेले वाहन आहे किंवा विकत घ्यायचे आहे तर जवळच्या RTO कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करावा आणि त्यांना मोटर वाहन कायद्यानुसार जर तुमचे वाहन, तुमची आर्थिक परिस्थिती आणि इतर बाबी योग्य वाटत असतील तर ते तुम्हाला परमिट देतील.
चिंटू:- अच्छा! म्हणजे RTO कार्यालय परमिट देते तर?
पिंटू:- नाही तसं बघायला गेलं तर RTO हा RTA म्हणजेच प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांचा सदस्य-सचिव या नात्याने सर्व कामकाज करतो म्हणून त्या कार्यालयात आपल्याला परमिट मिळते.
चिंटू:- आता हे RTA काय आहे?
पिंटू;- RTA हे प्रादेशिक स्तरावर वाहन परवान्यांचे सर्व कामकाज स्थापन केलेलं प्राधिकरण ज्यामध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर आरटीओ हे सदस्य-सचिव आणि पोलीस आयुक्त (परिवहन) किंवा पोलीस अधीक्षक हे सदस्य असतात. पण या पण या प्राधिकरणाचे सर्व कामकाज म्हणजे परवानासाठी आलेला अर्ज स्वीकारणे आणि इतर काही काम असतील तर ते RTO मार्फत केले जातात.
चिंटू:- बर मग माझ्याकडे समजा Transport वाहन आहे आणि परमिट नसेल तर..
पिंटू;- Transport वाहन हे विनापरवाना वापरणे हा गुन्हा आहे त्यासाठी मोटार वाहन कायद्याच्या कलम 192 (A) नुसार 10,000 रुपये दंड देतात म्हणून Trasnport वाहनांना परमिट असणे हे खूप महत्त्वाचे आहे
चिंटू:- जर मग Transport वाहनाने इतर गुन्हे केले तर जसे की ते वाहन Without फिटनेस चालविणे
पिंटू;- मग दंड होणार की जर तुमचे वाहन HGV (Heavy Goods Vehicle) असेल तर त्याला ४००० रुपये CF आणि ८००० रुपये DA असा एकूण १२००० रुपये दंड मिळणार
चिंटू:- आता CF आणि DA हा काय प्रकार नेमका
पिंटू;- CF म्हणजे मोटर कायद्याचा एखादा गुन्हा मिटवण्यासाठी दिलेली कायदेशीर रक्कम म्हणजेच तडजोड शुल्क त्यालाच Componding Fee (CF) म्हणतात आणि तुमचे वाहन परवाना घेऊन वापरत आहेत म्हणून सदर वाहनाचा परवाना निलंबना ऐवजी दिलेली रक्कम म्हणजेच DA (Departmental Action).
चिंटू:- अरे बापरे हे तर म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोन शिक्षा, असं चालतंय का?
पिंटू;- चालतंय कि, एकाच गुन्ह्यासाठी दोन शिक्षा एकाच Authority द्वारे देता येत नाही परंतु तुमच्या गाडीच्या बाबतीत दोन Authority कार्यरत आहेत जसे की एक वाहन म्हणून RTO तर परवाना आहे म्हणून RTA म्हणून दोन शिक्षा चालतात.
चिंटू:- म्हणजे मग एखाद्या Transport वाहनाने मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केले तर CF आणि DA असतोच का?
पिंटू;- सर्वच वाहनांच्या बाबतीत नसतो मगाशी आपण बोललो काही Transport वाहनांना परवान्याची आवश्यकताच नसते मग त्या वाहनांना DA देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही म्हणून तशा वाहनांना फक्त CF द्यायचा असतो.
बर पुरे झाले तुझे प्रश्न इतरांचे पण परमिट संबंधित प्रश्न असतील तर त्यांना पण संधी दे, विचारा आपले प्रश्न…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा